जयकुमार गोरेंना अडकविण्यात शरद पवारांची माणसं, सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे आरोपींना फोन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप  

जयकुमार गोरेंना अडकविण्यात शरद पवारांची माणसं, सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे आरोपींना फोन!

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध कट रचण्यात आला होता आणि यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची लोकं होते, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणातील आरोपीच्या संपर्कात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आपण राजकारण करायचे मात्र कोणाला जीवनातून उठवायचे अशा प्रकारच्या हेतून जर राजकारण होत असेल तर ते योग्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, गोरे यांच्या संदर्भातील केस २०१६ मध्ये रजिस्टर झाली आणि २०१९ मध्ये ती संपली, ते भाजपमध्ये नव्हते. मात्र, अचानकपणे हे उकरून काढण्याचे प्रयत्न केला गेला. त्यांच्या हिमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत कि नाही, घराचांचा समाजामध्ये अपमान नको, म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील कि नाही ते पाहतो. पण लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली, कारण या प्रकरणामधुन ते सुटेल आहेत.

तक्रारीनंतर ट्रॅप लावण्यात आला आणि यामध्ये संपूर्ण संभाषण टेप झालं. सगळी मागणी टेप झाली. पोलिसांना मागणी योग्य असल्याची खात्री पटल्यानंतर सापळा रचत पैसे देताना आरोपीला पकडले. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. शेवटी त्यांच्याही घरी २२ वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल?, याचाही विचार आपण केला पाहिजे.

हे ही वाचा : 

जगातील सर्वात जुनी डाळ, जी पोटातील पथरी देखील विरघळवण्याची क्षमता ठेवते

औषधीय गुणांनी परिपूर्ण कौंच बिया, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांची चमक

‘शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ विषयावर व्याख्यान

ते पुढे म्हणाले, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये ती महिला, तुषार खरात आणि अनिल सुबेदार याचा समावेश आहे. या तिघांनी मिळून हा कट रचला, याचे संपूर्ण पुरावे सापडले आहेत. यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. यांचे दीडशे फोन झालेले आहेत. कशाप्रकरे कट रचला हे लक्षात आले आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, यामध्ये थेट या सगळ्यांशी संपर्कात राष्ट्रवादी शरद पवारांची लोकं दिसत आहेत. हे सर्व पुराव्यानिशी सांगतो.

प्रभाकर राव देशमुख हे १०० वेळा तीनही आरोपींशी बोलले आहेत. मला त्यापेक्षा वाईट वाटत ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातला गेले आणि त्यांनी गोरे यांच्या विरुद्धचे बनवलेले व्हिडीओ यांना पाठवले. आता याची चौकशी होईल. आपण राजकीय शत्रू नसू राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारे एखाद्याला जीवनातून उठवायचे हे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

इंद्रजित सावंत कुत्र्याच्या मागे का लागलेत ? | Mahesh Vichare | Indrajit Sawant | Waghya Kutra |

Exit mobile version