अनाथांचे नाथ देवेंद्र फडणवीस

अनाथांचे नाथ देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शंभर अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. नागपुर मधील एका सामाजिक संस्थेच्या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी यासंबंधीची घोषणा केली. फडणवीस यांच्या या निर्णयातून त्यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा राज्याला झाले आहे.

कोविडच्या या महामारीत सारे जग होरपळून निघत आहे. देशभरातील हजारो माणसे या विषाणूने आपल्यापासून हिरावून नेली आहेत. देशभरात अनेक बालकांचे छत्र या महामारीमुळे हरपले आहे. त्यांचे आई-वडील या कोविडने हिरावून घेतले. अशा मुलांसाठी नागपूरच्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांनी ‘सोबत’ नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे अपरिपक्व

चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली

ठाकरे सरकार मद्याच्या धुंदीत, कारभार हलेडुले

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

या उपक्रमाच्या अंतर्गत कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली जाणार आहे. या बालकांना शिक्षण, आरोग्य सुविधा, पोषक अन्न आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थेसोबत नोंदणी होणाऱ्या पहिल्या १०० मुलांची जबाबदारी आपण स्विकारणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच त्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील सर्व अनाथ मुलांची जबाबदारी स्विकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या संस्थेच्या पाठीशी आपण उभे राहणार असून संस्थेला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण संस्थेला लागेल ती मदत करू असा विश्वास त्यांनी दिला आहे.

Exit mobile version