महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडले. राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस यांच्या भाजपा-शिवसेनेचा हा पहिलाच अर्थसंकल्प. फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित असेल असे सांगत अर्थसंकल्पाचे पाच प्रमुख भाग कोणते ते सांगितले.
शाश्वत शेती, महिला ओबीसी मागास वर्ग विकास, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मित, पर्यावरण पुरक विकास हे पाच मुद्दे पंचामृत धोरणामध्ये असतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
हेही वाचा :
स्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार
होळीचे फोटो शेअर केले आणि काहीवेळाने अभिनेते सतीश कौशिक यांचे प्राणोत्क्रमण
महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच टॅबवरून अर्थसंकल्पाचं अर्थमंत्री म्हणून वाचन फडणवीस यांनी केले. एक-एक करत पाच मुद्द्यांच्या तरतुदी आणि योजनांची घोषणा त्यांनी केली. मात्र शेवटच्या मुद्द्याकडे वळण्याआधी पंचामृत योजनेमधील मुद्द्यांचा अमृत असा करत असलेला उल्लेख लक्षात घेत फडणवीस यांनीच एक मजेदार विधान करत कोटी केली. देवेंद्र फडणवीस यांनी पाचही मुद्दे झाल्यानंतर यातील पंचामृताकडे वळतो असे म्हणाले.
यावेळी फडणवीस थोडे थांबून, मी शब्द जरा जपून वापरतोय, चुकून अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही भलताच अर्थ काढाल, असे म्हटले. यानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. विरोधकही खदखदून हसले. यानंतर फडणवीस यांनी डोक्यावरून हात फिरवला. दरम्यान सभागृहामध्ये सदस्यांचा हशा सुरूच होता. काही सेकंद थांबल्यानंतर फडणवीस यांनी पुढील भाषण सुरू केले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता असल्याने त्यांनी ही लिंक जोडली.