आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही या हल्ल्याच्या वाईट आठवणी आणि जखमा प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले होते. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मीडियावर शहिदांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो मानवतेवर आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता. हा हल्ला करताना केवळ मुंबईलाच किंवा फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्यासाठी करण्यात आला होता. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही आजही या हल्याच्या आठवणी मनात ताज्या आहेत.
हे ही वाचा:
भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला
छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती
I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
दहशतवादी हल्ले भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील होत आहेत. हा हल्ला मानवतेवर आणि संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना एकजुटीने या विरोधात लढावं लागेल. माझा विश्वास आहे, की या लढ्यात मानवता जिंकेल आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
26/11 हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला होता..https://t.co/GY5vpEB6Ex#Mumbai #MumbaiAttack pic.twitter.com/OjYY68D4fc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2021
२६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानमधून सागरी मार्गाने आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करून क्रूरतेची सीमा पार केली होती. या हल्ल्यात अनेक सामान्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले होते.