काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, जर महाराष्ट्रात सेंद्रीय शेती केली गेली नाही तर वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे फडणवीस अर्थात भाजपा शिवसेना युतीच्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केला आहे. या शेतीला आपण प्रोत्साहन देणार आहोत, असे फडणवीस म्हणाले तर पुढील ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
कृषि उत्पन्न बाजारपेठेत माल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत भ्रमिष्ट झालेत, त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या!
शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये, शिवप्रेमींसाठी भरघोस योजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भुजबळांवर का वैतागले?
होळीचे फोटो शेअर केले आणि काहीवेळाने अभिनेते सतीश कौशिक यांचे प्राणोत्क्रमण
शेतकर्यांना निवारा-भोजन
शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
देवेंद्र फडणवीस यांनी शेतीविषयक ज्या काही घोषणा केल्या त्या अशा…
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
१००० जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
३ वर्षांत १००० कोटी रुपये निधी
नागपुरात कृषी सविधा
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
या केंद्रासाठी २२८ कोटी रुपये देणार
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /२० कोटी रुपये तरतूद