“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”

मंत्रालयातील कार्यालय तोडफोडीच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने गोंधळ घालत तोडफोड केली. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात असून यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मंत्रालयातील कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची असून संबंधित महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्वीगतेने तिने हे कृत्य केले का? किंवा तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. व्यथाही दूर केली जाईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

लाडक्या बहि‍णीचा राग अनावर झाला म्हणून हा असंतोष पाहायला मिळाला, अशी टीका विरोधकांनी केली असून यावरही देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ,” असे देवेंद्र फडणवीस म्हणले.

हे ही वाचा : 

हरियाणा काँग्रेसने आपल्या १३ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक

आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार

या घटनेनंतर मंत्रालयातील कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असताना यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधकांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी रॉकेल ओतून घेतलेले आहे. मंत्रालयात कुणाचीच अडवणूक केली जात नाही. काही लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही,” अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे.

Exit mobile version