फडणवीसांनी काढला चिमटा, ‘फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री झाला तर अडचण होते!’

आमदार अमित साटम यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले उद्गार

फडणवीसांनी काढला चिमटा,  ‘फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री झाला तर अडचण होते!’

‘एखाद्याला एखाद्या गोष्टीत आवड आहे त्याच गोष्टी त्यांनी कराव्या. एखाद्याची आवड फोटोग्राफी असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर काय होतं? अडचण होते,’ असा टोला देवेंद्र फडणवीसांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना लगावला. आमदार अमित साटम यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या “उडान” पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की,  ‘ अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले. मी थोडं वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत. के. श्रीकांत हे ज्याचे आवडते फलंदाज असतील तर  ती व्यक्ती आक्रमक असणारच.  ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्यातले अमित साटम आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी यावेळी साटम यांची स्तुती केली.

हे ही वाचा:

टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता

रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

अयोध्येत पाणी तुंबले, खड्डे पडले; योगींकडून अधिकारी निलंबित

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

 

त्यावेळी उद्धव ठाकरे यांना टोमणा मारताना फडणवीस म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते, पॅशन असते, त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते’.

गेल्या आठवड्यात विधानसभा अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात भेटले. दोघांनीही लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. त्यावरून बरीच चर्चा झाली. दोन्ही नेते एकत्र लिफ्टमध्ये गेल्याचे आणि नंतर बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या दिशेने गेल्याचे पाहायला मिळाले. फडणवीसांच्या या टोमण्याला संजय राऊत यांनी उत्तर दिले. फोटोग्राफर असेल तर तो राज्याचे चित्र उत्तम काढू शकतो, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे मात्र यावर काही बोललेले नाहीत.

Exit mobile version