राज्यातील महत्वाकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा विस्तार करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनी राज्यातील ३०० आपला दवाखानांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ८ कोटी जनतेला आता मोफत उपचार मिळणार असल्याची महत्वाची माहिती नागपूरमध्ये बोलतांना दिली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एक चांगली योजना सुरू आहे. या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत देण्यात येतात. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचा उपचार मोफत मिळतो. या योजनेच्या माध्यमातून ९०० शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळतील. त्याचा राज्यातल्या १२ कोटींपैकी तब्बल ८ कोटी लोकांना फायदा होईल. किडनी प्रत्यारोपणासाठीही ४ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आता आपला दवाखानातूनही अनेक सेवा मोफत मिळतील. दवाखान्यात तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आपला दवाखाना या संदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले , त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत. किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
आपलं दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले, आपला दवाखानामध्ये वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी
‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’
इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार
जन्मदिनीच झाला पुनर्जन्म!! भिवंडी दुर्घटनेत २० तासांनंतरही तो राहिला जिवंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्पना मांडली. ती तानाजी सावंत यांनी पूर्णत्वास नेली. महाविकास आघाडीचे सरकार असताना एक रुपयांत उपचार करण्याची घोषणा केली. मात्र, अडीच वर्षांत त्यांनी एकही दवाखाना सुरू केला नाही. आम्ही ५०० दवाखाने सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर दोनच महिन्यात ३०० दवाखाने सुरू होत आहेत. हीच गतिमान सरकारची पावती असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.