‘महाराष्ट्र आज एका मातेला, एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे’

‘महाराष्ट्र आज एका मातेला, एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे’

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुताई यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे.

वात्सल्याची सिंधु, अनाथांची माय अशा अनेक नावांनी सिंधुताईंना समाजात ओळखलं जात होतं. नुकताच त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या फक्त अनाथांसाठी माय नव्हत्या तर अनेक महिलांसाठी प्रेरणा होत्या. आयुष्यामध्ये आयुष्य संपवण्याचा विचार ते अनाथांसाठी वात्सल्यपूर्व माय बनण्यापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा होता, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांना भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांच्या वागण्यातून त्या आपल्या आईच आहेत असे वाटायचे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपल्यातून माताच निघून गेल्याची भावना आहे. दुसऱ्या सिंधुताई होऊच शकत नाहीत, पण त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन त्याचं हे कार्य पुढे न्यावं लागेल, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!

मुख्यमंत्री असताना अनेकदा कामानिमित्त भेट होत असे आणि तेव्हा त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान. पण, प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे, एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. सिंधुताई सपकाळ यांना माझी विनम्र श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या दुःखात सहभागी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version