गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शोक व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला आहे.
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. #LataMangeshkar pic.twitter.com/D0sZI0x2RY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यातून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
‘लताजींची दैवी वाणी कायमची शांत झाली, पण त्यांचे सूर अमर राहतील, गुंजत राहतील’
‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’
स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम
लता दीदींच्या जाण्याने वैयक्तिक आणि मोठी हानी झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस त्या करायच्या. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे, या आठवणींना देवेंद्र फडणवीस यांनी उजाळा दिला आहे.
त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे.#LataMangeshkar pic.twitter.com/DgAzqAU9jb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे.
त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील.
भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
ॐ शांती.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022