मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले आहे, या पदावर राज्याच्या गृहविभागाने १९९४च्या बॅचचे जेष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती केली आहे.
विशेष पोलीस आयुक्त यांच्याकडे पोलीस दलाचे कुठले अधिकार असतील असा प्रश्न अनेकांना पडला होता, मात्र हे विशेष पोलीस आयुक्त हे पद पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली असणार आहे. मुंबई पोलीस दलातील सर्व सह पोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्त यांना रिपोर्ट करतील आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्त यांना रिपोर्ट करतील.
विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्तलयात पोलीस आयुक्तांच्या जुन्या कार्यालयात आपला पदभार स्वीकारणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या अधिपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी “अपर पोलीस महासंचालक’ दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, या पदाला “विशेष पोलीस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
कुलाबा केंद्राने जिंकली बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा
फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार
उर्फी जावेदची घाणेरडी, विकृत वृत्ती महिला आयोगाला मान्य आहे का?
सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार
विशेष पोलीस आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या यांच्या अधिपत्याखाली असणार आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार गुन्हे,कायदा व सुव्यवस्था,आर्थिक गुन्हे ,प्रशासन या विभागाचे सहपोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्त यांना रिपोर्ट करतील आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्त यांना रिपोर्ट करतील.
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांनी यापूर्वी मुंबई पोलिस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून कायदा व सुव्यवस्था, ,आर्थिक गुन्हे शाखा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे या पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आलेली व महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईतील काही हाय-प्रोफाइल प्रकरणांसह शहरातील काही महत्वाच्या तपासामध्ये देवेन भारती यांचा समावेश होता.