मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता सह पोलीस आयुक्त (कावसु) यांच्या दालनात पदभार स्वीकारला आहे.
पोलीस दलात हे पद नवीन असल्यामुळे या पदावरील अधिकारी यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आलेली नव्हती अखेर पहिल्या मजल्यावर विशेष पोलीस आयुक्त यांचे दालन निश्चित करण्यात आले असून या दालनाची डागडुजी सुरू आहे.
मुंबई पोलीस दलाचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात दाखल झाले. सर्वात प्रथम त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते सह पोलीस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांच्या दालनात विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर सर्व सह पोलीस आयुक्त यांची चौधरी यांच्या दालनातच भेट घेऊन कामाचा आढावा घेत चर्चा केली.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
भारती यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरून ‘मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कोणीही सिंघम नाही, असे ट्विट भारती यांनी केले. दरम्यान विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद असल्यामुळे नवीन विशेष पोलीस आयुक्त यांना बसण्याची व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नव्हती.
देवेन भारती मुंबईचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी होती त्यावेळी ते ज्या दालनात बसायचे त्या दालनाकडे गेले व तेथील पाहणी असून त्या ठिकाणी विशेष पोलीस आयुक्त यांचे नवीन दालन असणार असून त्या दालनाची रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे.