पंतप्रधान मोदींची निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासाचा विजय’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटकरत मानले जनतेचे आभार

पंतप्रधान मोदींची निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासाचा विजय’

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात महायुतीमधील भाजपा-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेल्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया आली आहे. ‘एकजूट होवून आम्ही आणखी उंच भरारी भरारी घेवू,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटकरत म्हणाले, विकासाचा विजय, सुशासनाचा विजय, आम्ही एकजूट होवून उंच भरारी घेवू. एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो. ‘जय महाराष्ट्र’, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटकरत महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. गृहमंत्री शाह ट्वीटकरत म्हणाले, ‘जय महाराष्ट्र’, या ऐतिहासिक जनादेशासाठी महाराष्ट्राच्या जनतेला कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी, महात्मा ज्योतिबा फुले जी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जी यांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राने, विकासाबरोबरच संस्कृती आणि राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या महायुतीला एवढे प्रचंड बहुमत देऊन, संभ्रम आणि खोटेपणाच्या आधारे संविधानाचे नकली हितचिंतक बनणाऱ्यांच्या दुकानाला टाळे ठोकण्याचे काम केले आहे. हा विजय प्रत्येक महाराष्ट्रवासियाचा विजय आहे.

हे ही वाचा  : 

महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिले

जनतेचा कौल मान्य; अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

प्रचार ईव्हीएमने केला की आणखी कोणी हे पाहिले पाहिजे!

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

 

 

 

Exit mobile version