पुणे बालेवाडी येथे आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून होत असल्याने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले सरकार हे देना बँकेचे सरकार आहे. मागचे हे वसुली सरकार होते. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यामध्ये ३,००० हजार रुपये प्रत्येकी खात्यामध्ये पोहोचले असल्याची माहिती त्यांनी सांगितले. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येतील, जो पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत तो पर्यंत योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ३१ जुलै पर्यंत फॉर्म जमा झालेल्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. आता ३१ ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील, त्याची छाननी झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकून तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. तसेच संप्टेंबर महिन्यात ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही पैसे मिळणार असून योजना कुठेही बंद होणार नाही. आमची ‘खटाखट खटाखट’ सारखी योजना नसून ‘फटाफट- फटाफट’ सारखी योजना असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बहिणींना ओवाळणी म्हणून सरकराने योजनेची घोषणा करताच सावत्र भावांच्या पोटात दुखणे सुरु झाले. योजना बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केला, कोर्टात गेले, मात्र कोर्टाने त्यांना नाकारले. त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, मोटर सायकल, बगीचाचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना सांगता येईल की, आम्ही फॉर्म भरले परंतु सरकराने तुमचे फॉर्म स्वीकारले नाहीत. तसेच सरकारच्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा टाकण्यात आला. जेणेकरून पोर्टल स्लोव झाले पाहिजे बंद पडेल पाहिजे. याच दरम्यान चार-पाच दिवस पोर्टल बंद पडले होते, मग याच लोकांनी पोर्टल बंद पडल्याचा हाहाकार सुरु केला. पोर्टल बंद पडल्यानंतर आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले अन ते फॉर्म पुन्हा पोर्टलवर आणले आणि आमच्या सरकराच्या जो बहिणींना पैसे देण्याचा निर्धार होता तो आम्ही पूर्ण केला, असे उपमुख्यंमत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
इराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सुदृढ लोकशाही, ती म्हणजे “भारत”…ब्रजेश कुमार सिंह (IPS)
वाशीमधील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी !
मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की, भारत विकसित व्हायचा असले तर भारताची ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो. महिलांचा विकास झाला नाहीतर भारत कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यंमत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना सुरु केल्या. लखपती योजना, लेक लाडकी योजना, रोजगार योजना, अशा विविध योजना महिलांसाठी आणण्यात आल्या आहेत. सुरवातीला दलाली सिस्टीम होती, मात्र, डीबीटीद्वारे थेट पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात, याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांना जाते. विरोधकांकडून अनेक गोष्टी सांगण्यात येतात की, १५०० रुपयांत महिलांना काय विकत घेता का?, अरे नालायकांनो आईचे आणि बहिणीचे प्रेम हे जगातील कुठलीच संपत्ती विकत घेऊ शकत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्याना १५०० रूपयाचे मोल कधीच समजू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना चालू केल्या होत्या. मात्र, मविआचे सरकार आल्यानंतर आम्ही चालू केलेल्या सर्व योजना त्यांनी बंद केल्या. आता पुन्हा तशी परिस्थिती झाली तर मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील सर्व योजना ते बंद करतील. ज्या राज्यात आपले सरकार चालू आहेत तिथे अशा योजना चालू आहेत. कर्नाटकमध्ये अशी योजना सुरु करण्याची घोषणा केली, परंतु त्यांनी ती बंद केली. तेलंगणामध्येही तशी घोषणा झाली, परंतु चालूच झाली नाही. मात्र, मंत्री शिवराज चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये योजना चालू केली आणि ती अजूनही सुरु आहे. छत्तीगढमध्ये देखील योजना सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना चालू केली आहे आणि ती कोणीही बंद करू शकणार नाही.