२०२५ मधील सर्वात मोठा उत्सव, महाकुंभ, आता संपणार आहे. १४४ वर्षातून एकदाच आयोजित होणाऱ्या या दुर्मिळ महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. २६ तारखेला महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नानानंतर महाकुंभाचा शेवट होणार आहे. महाकुंभ संपायला दोन दिवस शिल्लक असल्याने भाविक प्रयागराजमध्ये गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२४ फेब्रुवारी) प्रयागराजमध्ये दाखल होत संगमात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतील आमदारही सोबत होते.
उपमुख्यमंत्री संगमात स्नान केल्यानंतर म्हणाले, महाकुंभची पवित्र ऊर्जा देशभरात पोहोचली. आपली संस्कृती, परंपरा पंतप्रधान मोदी पुढे नेत आहेत. प्रयागराजमधून चांगली प्रेरणा घेऊन जाणार. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्नान केले. यावेळी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांनी देखील संगमात स्नान केले.
तसेच बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार प्रचंड गर्दीत सामान्य लोकांप्रमाणे सामील झाला आणि त्याने स्नान केले. यावेळी अक्षय कुमारसोबत आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी देखील संगमात स्नान केले. अभिनेत्री कैटरीना कैफ यांनी देखील महाकुंभात सहभागी होत त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी त्यांनी स्वामी चिदानंद सरस्वती और साध्वी भगवती सरस्वती यांचा आशीर्वाद घेतला.
हे ही वाचा :
इरा जाधव, अनिरुद्ध नंबुद्रीने जिंकले सुवर्णपदक
बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला; एकाचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी!
यूएसएआयडीने मंजूर केलेले प्रकल्प सरकारच्या भागीदारीत
दरम्यान, १३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभचा २६ फेब्रुवारी रोजी शेवट होणार आहे. त्यामुळे मिळेल त्या गाडीने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. सकाळ पासूनच घाटावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. आतापर्यंत ६२ करोडहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. तर हा आकडा ६५ कोटीच्यावर जाणार असल्याची आशा सरकारने व्यक्त केली आहे.