सहाव्यांदा मला जनता विजयाचा आशीर्वाद देईल!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

सहाव्यांदा मला जनता विजयाचा आशीर्वाद देईल!

भाजपाचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२५ ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मागील २५ वर्ष नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून निवडून येत आहेत. या निवडणुकीतही नागपूर दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी ‘भव्य नामांकन रॅली’ काढण्यात आली. यारॅलीत मोठ्या प्रमाणात पुरुष-महिलांचा सहभाग होता. यावेळी जनतेला  संबोधित करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या पेक्षा आपले काम जास्त बोलते. १० वर्षांचे आमचे काम बघा, आम्हाला साडे सात वर्ष मिळाली आणि केंद्रातील १० वर्ष. त्यापूर्वीचे १५ वर्षांचे काँग्रेसचे काम आणि आमचे काम बघा, बदलेला नागपूर इथला स्थानिक पाहतोय.

हे ही वाचा : 

“भारत आणि जर्मनीमधील मैत्री प्रत्येक टप्प्यावर, आघाडीवर अधिक घट्ट होतेय”

देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय

पुण्यानंतर आता अहमदाबादमध्ये घुसखोर बांगलादेशी सापडले!

हरयाणा विधानसभा अध्यक्षपदी हरविंदर कल्याण यांची निवड होणार

देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवभारताची निर्मिती सुरु केली, त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकून नवमहाराष्ट्र निर्मितीची सुरुवात केली आहे. विरोधकांवर मी बोलणार नाही, कारण आमच्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरेशा आहेत. लाडक्या बहिणींचा तोंडाचा घास पळविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुनील केदार, पटोले यांनी नागपूरच्या कोर्टात केस केली, यांना आमच्या बहिणीच पुरून उरणार आहेत. या निवडणुकीमध्ये सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देणार आहे, असा विश्वास असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

रॅलीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासासाठी दिलेले प्राधान्य हे सर्वांना माहित  आहे. मला सांगताना याचा आनंद होतोय, आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आणि काँग्रेसला ६०-६५ वर्षे राज्य करण्याची संधी मिळाली. पण, ज्या काँग्रेसने ६० वर्षात केले नाही, ते फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि नागपूरसाठी करून दाखविले.

Exit mobile version