राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवत महायुतीने मविआचा सुपडा साफ केला. या निवडणुकीमध्ये बऱ्याच बड्या नेत्यांचा पराभव झाला तर काही नेते काठावर पास झाले. अशीच लढत कर्जत जामखेडमध्ये पाहायला मिळाली. राष्टवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार विरुद्ध भाजपाचे राम शिंदे अशी लढत होती. या अटीतटीच्या सामन्यात रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. दरम्यान, रोहित पवारांच्या विजयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोला लगावला आहे. रोहित पवार तू ‘थोडक्यात वाचलास’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आले होते. यावेळी अजित पवार पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टीका करणाऱ्या काका-पुतण्यामध्ये मिश्कील संवाद पाहायला मिळाला. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पाया पडले. यावेळी त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला. भेटीदरम्यान, अजित पवार रोहित पवारांना म्हणाले, दर्शन घे काकांचं. शहाण्या थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झाल असत?, असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
दरम्यान, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना १२७६७६ तर भाजपाच्या राज शिंदे यांना १२६४३३ इतकी मते पडली. या अतिटतीच्या सामन्यात रोहित पवार अवघ्या १२४३ मतांनी विजयी झाले.
हे ही वाचा :
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!
नौदलाच्या INSV तारिणीने ऑस्ट्रेलियातून दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला सुरुवात
निवडणुकीतील पराभावानंतर काँग्रेसकडून लोकशाही मुल्यांचा अनादर