‘मणिपूरमधील हिंसाचारावर लष्कर केवळ तात्पुरता उपाय देऊ शकते. मात्र कायमस्वरूपी तोडगा केवळ हृदयातून दिला जाऊ शकतो, गोळ्यांनी नव्हे,’ असे मत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी व्यक्त केले आहे.
‘लष्कर हा प्रश्न सोडवू शकणार नाही. दिलेली परिस्थिती ते शांत करू शकतील किंवा तात्पुरता तोडगा काढू शकतील,’ असे ते म्हणाले. हिमंता यांनी गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर हल्ला चढवला. ‘विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला पण तो मणिपूरच्या प्रेमापोटी नव्हता तर, राजकीय हितसंबंधांसाठी होता,’ असेही ते म्हणाले.
सर्वोच्च सुरक्षा अधिकार्यांनी यापूर्वीही सांगितले आहे की, मणिपूरमधील प्रतिस्पर्धी गटांची कठोर भूमिका आणि हिंसाचार लष्करी पर्यायाने बदलता येणार नाही. त्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे. सरमा यांनीही हा पैलू अधोरेखित केला आणि मणिपूरबद्दल काँग्रेसला वाटणारी चिंता कशी खरी नाही, हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. ‘मोदी ईशान्येकडील प्रदेशांबद्दल मनापासून बोलतात. पंतप्रधानांनी मणिपूरवर बोलायला हवे, अशी काँग्रेसची मागणी होती, परंतु पंतप्रधानांनी बोलायला सुरुवात केल्यावर ते बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा हेतू केवळ संसदेत व्यत्यय आणण्याचा होता आणि त्याचा मणिपूरशी काहीही संबंध नाही. याप्रकारे त्यांचा डाव पूर्णपणे उघड झाला. त्यांनी संसदेत आवाज उठवला पण ते मणिपूरच्या प्रेमापोटी नव्हते तर केवळ राजकीय स्वार्थासाठी होते,” असे सरमा म्हणाले.
हे ही वाचा:
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक
बलुचिस्तानमधील नेता घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ
महसूल गुप्तचर विभागाकडून ७.८५ कोटी किंमतीचे कोकेन जप्त
गृहमंत्र्यांवर टीका
गृहमंत्री शाह यांची लोकसभेत शुक्रवारी म्यानमारमधून निर्वासितांच्या येणाऱ्या लोंढ्यामुळेच मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष होत असल्याचे विधान केले होते. या विधानाबद्दल मणिपूरच्या १० कुकी आमदारांनी ( ज्यात भाजपच्या सात आमदारांचा आणि ‘इंडिजिनीअस ट्रायबल लीडर्स फोरम’च्या च्या नेत्यांचा सहभाग आहे) टीका केली. या आमदारांनी शहा यांना कथित बेकायदा घुसखोरांचा तपशील आणि त्यांच्या सहभागाचे पुरावे सादर करण्याची विनंती केली. शहा यांचा असा दावा आहे की, कुकी-झोमीहमर लोकांमधील वांशिक संघर्ष हा म्यानमारमधून होत असलेल्या घुसखोरीमुळे होत आहे, हे वक्तव्य निराशाजनक आहे, अशी टीका आमदारांनी केली.