गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात जात असतात. या दिवसांत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ज्यादाच्या बसही सोडण्यात येतात. मात्र या बस सोबतच मोठ्या संख्येने खासगी बसही याच मार्गावर धावत असतात.
परंतु त्यांच्याकडून ज्यादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी बसेस सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसही चालवल्या जातात आणि जास्त भाडे आकारून लूट केली जाते. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदरच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने २०१८ मध्येच निश्चित केले आहेत. तरीही नियमांकडे दुर्लक्ष करून जास्त बस भाडे खासगी वाहतूकदारांकडून आकारले जातात. या संबंधीच्या अनके तक्रारी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येतात.
हे ही वाचा:
हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा
पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
खासगी बसेस ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणापासून किलोमीटरप्रमाणे भाडेदराचा तक्ता प्रसिद्ध करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. अधिक दर आकारल्यास कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. खासगी प्रवासी बसमधून प्रवास करताना अडचणी आल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी ईमेल आयडीची सोय केली आहे. mvdcomplaint.enfs@gmail.com या ईमेल आयडीवर प्रवाशांना तक्रार नोंदवता येऊ शकते.