उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून यामुळे अनेक ठिकाणी पहाटे धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. दिल्लीत शुक्रवारी पहाटे अनेक ठिकाणी दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे कमी अंतरावरही दृष्यमानता कमी झालेली आहे. तसेच दाट धुक्यामुळे नवी दिल्लीमधील रेल्वे सेवा बाधित झाली असून विमान सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने शुक्रवारसाठी दाट धुक्याचा येलो अलर्ट जारी केला आहे.
धुक्यामुळे दिल्लीत अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. या शितलहरीमुळे आणि धुक्यामुळे मानवी आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. तसेच दिल्ली विमानतळावर २०० हून अधिक उड्डाण सेवांना उशीर झाला आहे. फ्लाइट मॉनिटरिंग वेबसाइट फ्लाइटराडरच्या मते, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी ७२ उड्डाणे उशिरा आहेत आणि सहा सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, येणारी २१५ उड्डाणे उशिराने दाखल झाली आहेत, तर १० रद्द करण्यात आल्या आहेत. कोलकाता विमानतळावर, १७ जाणारी उड्डाणे उशिराने असून एक सेवा रद्द करण्यात आली आहे. तर ३६ आगमन उड्डाणे देखील उशिरा आहेत.
हे ही वाचा :
सपा खासदार बर्क यांना दणका; एफआयआर रद्द होणार नाही
फिलिपाईन्स, व्हिएतनामनंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्राह्मोस’!
चक्क ‘सामना’ म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!
मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक
अनेक लांब पल्ल्यांच्या सेवांसह किमान २४ गाड्या धुक्यामुळे उशिराने धावत आहेत, असे रेल्वेने सांगितले. यातील काही गाड्यांना चार ते पाच तासांपर्यंत उशीर होण्याची शक्यात असल्याचे म्हटले आहे. प्रभावित सेवांमध्ये कर्नारका आणि बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस, भटिंडा-बलुरघाट फरक्का एक्स्प्रेस, आंध्र प्रदेश एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. सलग पाचव्या दिवशी थंडीची लाट होती, शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांमध्येही दाट धुक्यासह थंडीची लाट जाणवत आहे.