डेन्मार्कने उडवला वेल्सचा धुवा, ऑस्ट्रियाला हरवताना इटलीची दमछाक

डेन्मार्कने उडवला वेल्सचा धुवा, ऑस्ट्रियाला हरवताना इटलीची दमछाक

शनिवार, २६ जून पासून युरो कप फुटबॉल स्पर्धेची पुढली फेरी अर्थात ‘राऊंड ऑफ १६’ ला सुरुवात झाली. ‘राऊंड ऑफ १६’ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये डेन्मार्कने वेल्स संघाचा सहज पराभव केला तर दुसरीकडे इटलीने ऑस्ट्रियावर निसटता विजय मिळवला. ह्या विजयासह डेन्मार्क आणि इटली हे दोन्ही हे दोन्ही संघ उप उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

राउंड ऑफ १६ चा पहिला सामना शनिवारी ९.३० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार सुरु झाला. या सामन्यात वेल्स आणि डेन्मार्क हे दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण कागदावर वेल्सचा संघ हा जास्त मजबूत वाटत होता. याला कारण होते डेन्मार्कचा स्टार खेळाडू एरिक्सनच्या जखमी होण्यामुळे डेन्मार्क संघाला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसे घडले नाही. डेन्मार्कने वेल्स संघाला ४-० फरकाने हरवले. डेन्मार्ककडून कॅस्पर डॉलबर्ग, जोआकिम मैहेले, मार्टिन ब्रेथवेट या खेळाडूंनी गोल केला. तर वेल्सचा खेळाडू हॅरी विल्सन याने एक स्वयंगोल नोंदवला.

शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात इटली संघ ऑस्ट्रियाचे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते. पण तसे घडताना दिसले नाही. ऑस्ट्रियाने इटलीला कडवी झूंज दिली. ९० मिनिटांच्या खेळामध्ये दोन्ही संघाना एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे खेळाच्या नियमांनुसार ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या वेळेत इटालिकडून फ्रेडरिको चिएसा याने ९८ व्या मिनिटाला गोल नोंदवत इटलीला आघाडी मिळवून दिली. तर मॅटीओ पेस्सीना याने १०५ व्या मिनिटाला गोल नोंदवत इटलीची आघाडी ही २-० ने वाढवली. ऑस्ट्रियाकडून ११४ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले.

Exit mobile version