मुंबईत डेंग्यू, मलेरियाने काढले डोके वर

मुंबईत डेंग्यू, मलेरियाने काढले डोके वर

मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता सोबतच मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांनी डोक वर काढायला सुरुवात केली आहे. रुग्णालयांमध्ये आता पावसाळी आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी नकार देण्यात येत नसला तरीही अतिदक्षता विभागात खाटांची संख्या खूप कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांना प्रकृती गंभीर असूनही आपत्कालीन कक्षामध्ये थांबून राहावे लागत आहे. पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये जमिनीवरही रुग्णांना दाखल करण्यात येत आहे.

लोकांच्या मनातून कोरोनाची भीती थोड्या प्रमाणात निघून गेल्यामुळे ताप आल्यानंतर तीन दिवसांनी चाचणी केली जाते. तापाची तीव्रता वाढल्यावर उपचारसाठी धावाधाव केली जाते. डेंग्यू आणि स्वाईन फ्लू यांची वैद्यकीय निदान निश्चित होण्यास कालावधी लागतो, असे दिसून आले आहे, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. ए. एस. वेल्हे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गाडी पुण्यात; दंड मुंबईत!

हिंदीत ‘ळ’ का गाळला जात आहे?

अनिल परबचे सहाय्यक खरमाटेंकडे साडेसातशे कोटींची मालमत्ता आली कुठून?

पेंग्विनच्या कंत्राटासाठी ५० टक्के वाढ कशी झाली?

परळ येथील वीणा पवार यांच्या भावाला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणार नसल्यामुळे रात्रभर अनेक ठिकाणी चौकशी करूनही त्यांना सरकारी रुग्णालयात खाट उपलब्ध झाली नाही. वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करून घेण्यात येईल; मात्र आयसीयू खाट उपलब्ध झाल्यावरच मिळेल असेही सांगण्यात आले.

कोरोनाकाळात रुग्णांना जमिनीवर ठेवणे योग्य नाही. रुग्णालयात रुग्णासोबत एखादी व्यक्ती असते, ती सतत आत बाहेर करत असते अशा वेळी संसर्गाची जास्त भीती असते. रुग्णसंख्या वाढत असली तरीही पालिका रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी नकार दिला जात नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘फ्लोअरबेड’ उपलब्ध करावे लागतात, असे पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

Exit mobile version