24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुंबईमध्ये डेंग्यूचा 'ताप' वाढला!

मुंबईमध्ये डेंग्यूचा ‘ताप’ वाढला!

Google News Follow

Related

मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असतानाच आता शहरात डेंग्यू आणि हिवतापाने डोकं वर काढले आहे. मुंबईतील डेंग्यू रुग्णांनी तीनशेपार आकडा गाठला असून गेल्या १२ दिवसांत मुंबईत डेंग्यूचे ८५ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती केंद्रे निर्माण होऊन डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत.

दरवर्षी ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. यंदाही ऑगस्ट महिन्यात १४४ रुग्ण आढळले होते, तर १२ सप्टेंबरपर्यंत नव्याने ८५ रुग्णांची भर यात पडली आहे. गेल्या वर्षभरात डेंग्यूचे १२९ रुग्ण आढळले होते. तर यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच शहरातील रुग्णांची संख्या ३०५ वर पोहचली आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी आतापर्यंत सुदैवाने डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मागीलवर्षी डेंग्यूमुळे तीन मृत्यू झाल्याची नोंद होती.

हे ही वाचा:

महिलांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई पोलिसांची निर्भया पथके

फोर्ड बंद होऊन देखील कर्मचाऱ्यांना ‘असा’ मिळणार दिलासा

राज्य सरकारचा हलगर्जीपणा कुपोषणाला कारणीभूत

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

सप्टेंबरमध्ये शहरात भायखळा, दादर, एल्फिन्स्टन रोड या भागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने या भागांमधील चार लाख ४६ हजार ७७ घरांमध्ये सर्वेक्षण करून डासांची ४१०८ उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. गेल्यावर्षी हिवतापाचे रुग्ण मोठ्या संख्येने होते. शहरात ५००७ रुग्ण आढळले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाचे रुग्ण कमी आढळले आहेत. ऑगस्टमध्ये हिवतापाच्या रुग्णांची संख्या ८४८ इतकी होती, तर सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत रुग्णांची संख्या ३६०६ इतकी आहे.

शहरात काही प्रमाणत लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये लेप्टोचे ३७ रुग्ण आढळले होते, तर सप्टेंबरमध्ये १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. स्वाईन फ्लूचे गेल्या वर्षी ४४ रुग्ण आढळले होते, तर त्या तुलनेत यंदाच्या वर्षी किंचित वाढ होऊन आतापर्यंत ५२ रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजारांमधील गॅस्ट्रोची लागण १९६४ जणांना झाली आहे तर हेपेटाईटिसची लागण १७९ जणांना झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा