जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल (१२ जून) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने देशभर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले.देशाबरोबर महाराष्ट्रातसुद्धा सर्व जिह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.मुंबईतील अंधेरीच्या कै.अजित मिरजकर चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटल्याचे पहायला मिळाले.
बजरंग दल जिल्हा मंत्री राजु करंबळेकर, बजरंग दल प्रांत सह-संयोजक गौतम रवेरिया, बजरंग दल पुर्व प्रांत प्रमुख व भाजप अंधेरी विधानसभा सर चिटणीस उमेश राणे यांनी यावेळी संबोधन केले आणि सर्वांनी पाकिस्तानी आतंकवाद्यांचा निषेध केला.हिंदूंवरील हल्ले सहन केले जाणार नाही, बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीमांना देशाच्या बाहेर हाकलवा, आतंवादाचा धिक्कार, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज या आंदोलनात सहभागी झाला होता.हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांचा बिमोड करावा, अशी मागणी यावेळी विहिंप आणि बजरंग दलाकडून करण्यात आली.तसेच ‘मोदी सरकार पाकिस्तान व इस्लामिक आतंकवादचा बंदोबस्त करेल, परंतु लोकांनी सावध राहावे आणि संघटित रहावे’, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
हे ही वाचा:
परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांचे निधन
मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!
३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!
हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!
जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी रविवार, ९ जून रोजी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात बस चालकाला गोळी लागली. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या खड्ड्यात गेली. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना हा हल्ला झाला होता.