कर्नाटकातील मंगळुरूमध्ये विहिंप आणि बजरंग दलाची निदर्शने !

सोशल मीडिया पोस्टवर संघटनांमध्ये नाराजी 

कर्नाटकातील मंगळुरूमध्ये विहिंप आणि बजरंग दलाची निदर्शने !

कर्नाटकातील मंगळुरुमध्ये मिलाद-उन-नबीशी संबंधित सोशल मीडिया पोस्टवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी (१६ सप्टेंबर) दोन्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मंगळुरूच्या रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यात आले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) जवान तैनात केले आहेत.

आज तकच्या वृत्तानुसार, रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री १०.३० च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी मंगळुरूच्या बाहेरील कटिपल्ला येथील बद्रिया मशिदीवर दगडफेक केली. यामध्ये मशिदीच्या काचा फुटल्या. याप्रकरणी मंगळुरू पोलिसांनी ५ जणांना अटक केली. हे सर्व लोक विहिंपशी संबंधित असल्याची माहिती आहे. या अटकेबाबत विहिंप कार्यकर्ते रात्री उशिरा संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रशासनाने ही निदर्शने वाढू न देता परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, मिलाद-उन-नबीशी संबंधित सोशल मीडिया पोस्टवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आज निदर्शने केली.

हे ही वाचा : 

बजाज हाऊसिंग फायनान्सची दमदार एन्ट्री; ११४ टक्क्यांनी वाढला शेअरचा भाव

हैद्राबादमधील सिकंदराबादमध्ये बाप्पाच्या वेशभूषेवरून वाद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? हल्लेखोर अटकेत

तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत स्पर्धा करू शकत नाही…

दरम्यान,  इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण प्रेषित हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम समाजात प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आणि मिरवणुका काढल्या जातात. सोमवार (१६ सप्टेंबर) संध्याकाळपर्यंत मंगळुरूच्या विविध भागांतून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या मिरवणुकांवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळुरू पोलीस सतर्क आहेत.

Exit mobile version