पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात

नवे सॅटेलाईट फोटो आले समोर

पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात

भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी (एलएसी) करार झाला असून भारत आणि चीनमध्ये पुन्हा या भागातील वावरण्याबाबत एकमत झाले आहे. अशातच भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील दोन राष्ट्रांच्या सैन्यांमधील संघर्ष संपवण्यासाठी करार केल्यानंतर काही दिवसांनीचं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यांच्या हालचालींची विघटन प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर ‘इंडिया टुडे’ने काही सॅटेलाईट फोटो जारी करत या भागातील विघटन प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले आहे.

पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथे जमिनीवर सुरुवातीच्या विघटन प्रक्रियेची पुष्टी करणारे काही फोटो समोर आले आहेत. शुक्रवारी घेतलेल्या नव्या सॅटेलाईट फोटोंनी अनेक ठिकाणच्या संरचनांमध्ये घट दर्शविली आहे, ज्यामुळे लवकरच या भागात शांतता प्रस्थपित होणार आहे. येत्या काही दिवसांत विघटन प्रक्रिया पूर्ण होण्याची दोन्ही बाजूंची अपेक्षा असून यूएस-आधारित मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सादर केलेले शुक्रवारचे फोटो, अलीकडील दिवसांमध्ये संरचना आणि आश्रयस्थानांचे विघटन दाखवून देत आहेत.

डेपसांग भागातील पेट्रोल पॉईंट १० जवळील अस्तित्वात असलेला एक मोठे बांधकाम हटवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, डेपसांगमधील मोठ्या वाहतूक वाहनांसह लष्करी चौकीवरील बहुतेक संरचना हलविण्यात आल्या आहेत, असे अनेक चित्रांमध्ये दिसून आले आहे.

हे ही वाचा : 

माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित

इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले

‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’

आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न…

करारानंतर दोन्ही देशांच्या बाजूने तंबू आणि काही तात्पुरती संरचना उद्ध्वस्त करण्यात आली आहे. भारतीय सैनिक चार्डिंग नाल्याच्या पश्चिमेकडे परत जात आहेत, तर चिनी सैनिक नाल्याच्या पूर्वेकडे माघार घेत आहेत. गुरुवारी चिनी सैन्याने या भागात त्यांच्या वाहनांची संख्या कमी केली आणि भारतीय सैन्यानेही काही सैन्य मागे घेतले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, येत्या चार- पाच दिवसांत डेपसांग आणि डेमचोकमध्ये पुन्हा गस्त सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत दोन्ही ठिकाणी तंबू आणि तात्पुरत्या पायाभूत सुविधा हटवण्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी म्हणजे आजही सुमारे या कामात २० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या दोन्ही देशांचे स्थानिक कमांडर या दोन ठिकाणांवर दररोज सकाळी संपर्कात आहेत आणि त्या दिवशी काय कारवाई करायची यावर चर्चा करत आहेत.

Exit mobile version