संस्कार भारतीचे अखिल भारतीय सरचिटणीस अमीरचंद कालवश

संस्कार भारतीचे अखिल भारतीय सरचिटणीस अमीरचंद कालवश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार परिवारातील संस्कार भारती या संस्कृतीक संघटनेचे अखिल भारतीय सरचिटणीस अमीरचंद यांचे निधन झाले आहे. शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी अमीरचंद यांनी अखेरचा श्वास घेतला. ईशान्य भारतातील अरूणाचल प्रदेश येथे त्यांचे निधन झाले.

अमीरचंद हे संघाचे प्रचारक असून गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘संस्कार भारती’ शी संबंधित कार्य करत होते. शनिवारी संघटनात्मक कामकाजाच्या निमित्ताने ते अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे जात होते. पण अचानक त्यांची प्राणवायूची पातळी खालावली. त्यामुळेच त्यांचे अकाली निधन झाले.

हे ही वाचा:

काँग्रेस नेता म्हणाला, इस्लामिक अजेंडा राबवला जातोय!

भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण

जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

अमीरचंद यांनी संस्कार भारतीच्या माध्यमातून कला क्षेत्रासाठी महत्त्वाचे कार्य केले. गेल्या काही काळात जेव्हा कोविड महामारीमुळे अनेक कलाकारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हा संस्कार भारतीच्या माध्यमातून एक लाख कलाकारांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. तर कलाकारांना मिळणाऱ्या सरकारी घरांबाबत नवीन धोरणाचा विचार करावा या मागणीसाठी कलाकारांचे शिष्टमंडळ घेऊन सांस्कृतिक मंत्र्यांना भेटले होते.

अमीरचंद यांच्या जाण्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, खासदार विनय सहस्रबुद्धे आदींनी अमीरचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Exit mobile version