आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक

आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांना मातृशोक झाला आहे. अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांचे सोमवार, २ मे रोजी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दूधसागर, गोरेगाव येथील राहत्या घरीच त्यांना देवाज्ञा झाली आहे.

आज संध्याकाळी ६ वाजता शैलजा भातखळकर यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर आरे येथील शिवधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Exit mobile version