रमजानचा महिना सुरू झाला असून अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रमजानच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी केली आहे. ‘टीव्ही ९मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरू असताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे म्हटलं आहे. लवकरच अचारसंहिता लागू होईल. दरम्यान, धार्मिक कार्यक्रमासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ची मागणी करण्यात आली आहे.
अनिल परब म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीसाठी अचारसंहिता लवकरच लागू होईल. रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम होतील. सोबत शिवजयंती आणि आंबेडकर जयंतीसुद्धा येणार आहे. अशावेळी लोकांना धार्मिक आणि महापुरुषांच्या स्मरणासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात कुठल्याही अडचणी येऊ नयेत. म्हणून ‘सिंगल विंडो सिस्टम’ची व्यवस्था राज्य सरकारने करावी,” अशी मागणी आहे.
हे ही वाचा:
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !
कोल्हापूर: लसीचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही महिलेचा रेबीजने मृत्यू!
शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!
अनिल परब पुढे असेही म्हणाले की, “आम्ही रमजानसाठी जी मागणी केली आहे, त्यात चूक काय आहे?. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला या संबंधी पत्र लिहिणार आहोत. आमच हिंदुत्व वेगळ आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही,” असा दावा अनिल परब यांनी केला आहे