संपूर्ण जगामध्ये कोविडचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. यामध्ये भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम चालू आहे. त्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसी वापरल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात अचानक कोवॅक्सिन लसीला लोकप्रियता मिळत आहे.
महाराष्ट्रात देखील लसीकरण मोहिम चालू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन्ही लसी उपलब्ध असताना, प्रशासनाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात कोवॅक्सिनच्या लसीला मागणी वाढली आहे. मुंबईतील लोकलमधून प्रवास करायचा असल्यास, लसीचे दोनही डोस घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोवॅक्सिन लसीची मागणी अचानक वाढली आहे.
हे ही वाचा:
बरखा दत्तने आता थेट तालिबानींची तळी उचलली
अफगाणिस्तानात विमानतळावर एसटीसारखी चेंगराचेंगरी
अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?
अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?
मुंबईतील लोकलमधून प्रवासासाठी लसीचे दोन डोस आवश्यक आहेत. कोवॅक्सिनच्या दोनही मात्रांमध्ये केवळ ३० दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही मात्रा घेतल्यानंतर त्यावर अधिक १४ दिवस जाऊन देऊनही केवळ ४५ दिवसांच्या अंतरात लोकलमधून प्रवास शक्य आहे. याऊलट कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे त्यावरील १५ दिवसांचे अंतर पाळून एकूण कालावधी ९९ दिवसांवर जातो. लवकरात लवकर लोकल वापरता यावी यासाठी लोकांकडून कोवॅक्सिनला अधिकाधीक पसंती दिली जात आहे.
महाराष्ट्रातील कोविड रुग्णसंख्या घटल्यानंतर १५ ऑगस्टपासून रेल्वे पास देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवासासाठी लोकल पास अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सुमारे लाखभर लोकांनी एक महिन्याचा रेल्वे पास खरेदी केले आहेत.