बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणारा चंदू चॅम्पियन हा सिनेमा पॅरालिंपिक गोल्ड मेडालिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. अतुलनीय जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले माजी सैन्यअधिकारी आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर यांच्या यशाची गाथा या चित्रपटात आहे. दरम्यान, मुरलीकांत पेटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मुरलीकांत पेटकर यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाचे शोज शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयात तरुणांसाठी विनामूल्य आयोजित करावेत, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. यावेळी त्यांच्या या विनंतीचा शासन नक्की विचार करेल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला.
हे ही वाचा:
दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून सहा जण जखमी
“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”
नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!
आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक
मुरलिकांत पेटकर यांचे संघर्षमय जीवन आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती ही आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या जीवनकथेतील हेच मूल्य शोधून दिग्दर्शक कबीर खान यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला घेऊन त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा बनवला असून त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. राज्यात हा सिनेमा यापूर्वीच टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र, तरीही तो सर्वच लहान मुलांना आणि तरुणांना पाहता यावा यासाठी या सिनेमाचे विशेष शोज आयोजित करावेत अशी मागणी मुरलीकांत पेटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.