पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या अशी मागणी हिंदू सेनेने केली आहे.हिंदू सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी नोबेल फाउंडेशनला तसे पत्र पाठवले आहे. हे पत्र फाउंडेशनच्या अधिकृत ईमेल आयडी आणि पत्त्यावर पाठवण्यात आले आहे. आपल्या पत्रात संस्थेने लिहिले आहे की, एक जागतिक नागरिक म्हणून मला विश्वास आहे की, पंतप्रधान मोदींनी जगात शांतता, मुत्सद्दीपणा आणि मानवतावादी मदत करण्याच्या दिशेने केलेले कार्य त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी योग्य उमेदवार बनवते.
न्युज १८च्या बातमीनुसार, हिंदु सेनेने आपल्या पत्रात म्हटले आहे की,पंतप्रधान मोदींनी देशांतर्गत आणि जगात सर्वत्र शांतता राखण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रादेशिक सहकार्य आणि संघर्ष संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.हिंदु सेनेने नोबेल फाऊंडेशनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शेजारी देशांशी भारताचे राजनैतिक संबंध मजबूत करणे हे पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे योगदान आहे.
हे ही वाचा:
सुधा मूर्तींची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती
“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”
१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेबर फर्स्ट या धोरणाचा अवलंब करून शेजारी देशांसोबत दक्षिण आशियाच्या पलीकडे असलेल्या देशांसोबत विश्वास, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.त्यांनी दीर्घकाळ चाललेले वाद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून शांतता आणि स्थिरतेसाठी मोठे योगदान दिले आहे, असे हिंदू सेनेने पत्रात लिहिले आहे.