दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!

आता या पाच संघांत लढत

दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर दिल्ली आणि लखनऊ यांच्यात रंगलेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला. या विजयाचा फायदा राजस्थानला झाला आहे. राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली आणि लखनऊ यांना प्लेऑफमध्ये जागा मिळवणे आणखी कठीण झाले आहे.

दिल्लीचे सर्व १४ सामने खेळून झाले आहेत. या १४ सामन्यांत संघाचे १४ गुण आहेत आणि धावगती -०.३७७ आहे. तर, लखनऊने १३ सामन्यांत १२ गुण कमावले आहेत. तर, संघाची धावगती -०.७८७ आहे. जर लखनऊला प्लेऑफसाठी जागा मिळवायची असेल तर, त्यांना शेवटच्या सामन्यात राजस्थाना मोठ्या धावसंख्येने पराभूत करावे लागेल. गुजरात, मुंबई आणि पंजाबचे संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या संघांना १३ गुणही कमावता आलेले नाहीत.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी सुमारे ५.१४ कोटी व्यक्ती-वर्षांच्या रोजगाराची निर्मिती!

संकुचित दृष्टिकोन नको, भारताने अमेरिकेला सुनावले

लिफ्टची साखळी तुटून कोलिहान खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवले

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फसवलं; काँग्रेसचा प्रचार करत नाहीत”

प्लेऑफसाठी आता दोन संघांना जागा असून पाच संघांमध्ये आता तिथे पोहोचण्यासाठी स्पर्धा होणार आहे. त्यात चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली आणि लखनऊ यांचा समावेश आहे. बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात जर बेंगळुरूने कोलकात्यावर १८ धावांनी किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना १८.१ षटकात लक्ष्य साध्य केल्यास तो प्लेऑफमध्ये पोहोचेल. जर, चेन्नईने विजय मिळवल्यास धावगती आणि १६ गुण याच्या जोरावर संघाला पुढे मार्गक्रमण करणे सोपे होईल.

Exit mobile version