27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषदिल्ली-वाराणसी इंडिगो विमानात बॉम्बची अफवा, प्रवाशांची धावाधाव!

दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानात बॉम्बची अफवा, प्रवाशांची धावाधाव!

आपत्कालीन दरवाजा मार्गे प्रवाशांना काढले बाहेर

Google News Follow

Related

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरताच एकच खळबळ उडाली.सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजा मार्गे आणि मुख्य दरवाजातून बाहेर काढण्यात आलं.यानंतर विमानाला तपासणीसाठी खुल्या ठिकाणी हलवण्यात आले.मात्र, ही धमकी नसून अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.

एअरलाइनने एक निवेदन जारी करत म्हटले की, दिल्ली विमानतळावर ही घटना घडली.दिल्ली ते वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६E२२११ या विमानात बॉम्ब असल्याची अफवा सुरु झाली.सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.मुख्य दरवाजा मार्गे आणि आपत्कालीन दरवाजा मार्गे सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.त्यानंतर विमानाच्या तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आले.

हे ही वाचा:

गुरुमित राम रहीम सिंगसह चौघांची निर्दोष मुक्तता

तेलंगणाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघातात मृत्यू

केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार

अभिनेता रणदीप हुड्डाने अंदमानला घेतले सावरकरांचे दर्शन!

सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे विमान पहाटे ५.३५ वाजता टेक ऑफ करणार होते.तत्पूर्वी विमानाच्या शौचालयात एका क्रूला टिश्यू पेपर सापडला, ज्यावर ‘बॉम्ब’ असा शब्द लिहिला होता.यानंतर क्रूने विमानतळ प्रशासनाला ही माहिती दिली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं.विमानाचे आपात्कालीन दरवाजेही उघडण्यात आले अन प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.विमानातून प्रवासी बाहेर पडत असतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.ज्यामध्ये प्रवासी आपत्कालीन मार्गे बाहेर पडताना दिसत आहे.

यानंतर विमानाची तपासणी करण्यासाठी विमान सुरक्षा दल आणि बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.पथकाने तपासणी केली मात्र विमानातून काहीही सापडलं नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान,सगळे प्रवासी सुखरुप असल्याचं विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा