राहुल गांधी दिल्ली विद्यापीठात घुसले, पाठवली जाणार नोटीस

विद्यापीठाला पूर्वकल्पना न देताच केलं प्रवेश

राहुल गांधी दिल्ली विद्यापीठात घुसले, पाठवली जाणार नोटीस

राहुल गांधी यांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. आता राहुल गांधी यांना दिल्ली विद्यापीठाचा अचानक केलेला दौरा महागात पडला आहे. शुक्रवार ५ मे रोजी राहुल गांधी यांनी अचानक दिल्ली विद्यापीठ गाठले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जवळपास तासभर राहुल गांधी विद्यापीठाच्या आवारात होते. कोणतीही परवानगी न घेता दौरा केल्याबद्दल दिली विद्यापीठ राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्याचं विचार करत आहे.

राहुल गांधी यांनी कोणतीही माहिती न देता विद्यापीठाला भेट दिल्याबद्दल दिल्ली विद्यापीठ नोटीस बजावणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव विकास गुप्ता यांनी सांगितले. अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन हॉस्टेलला दुपारी भेट दिली होती. येथे त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत भोजनही केले. जवळपास एक तास ते तिथे होते. ही अनधिकृत भेट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी आत गेले तेव्हा विद्यार्थी जेवण करत होते. आम्ही आमच्या विद्यापीठाच्या आवारात हे सहन करू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुन्हा असे कृत्य करू नये, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे

इम्रान अटकेनंतर पाकिस्तानात निर्माण झालेल्या अराजकाला म्हणे नरेंद्र मोदी जबाबदार!

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

इम्रान खानचे समर्थक ठरले मोरावर चोर

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानेया काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने राहुल गांधींविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी कुलसचिवांनी आरोप फेटाळून लावत ‘असा कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. ही शिस्तीची बाब असल्याचे ते म्हणाले. अशा घटना टाळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version