26 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरविशेषयावर्षी दिल्लीत प्रदूषण घटणार? काय आहे कारण?

यावर्षी दिल्लीत प्रदूषण घटणार? काय आहे कारण?

Google News Follow

Related

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये शेतातील तण जाळण्याच्या प्रकरणांमध्ये या वर्षी ‘लक्षणीय घट’ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये कमी आगीची नोंद झाली आहे. असे पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. तण जाळल्याने दिल्लीसकट उत्तर भारतामध्ये प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

२०२० मध्ये याच कालावधीत ४,८५४ घटनांच्या तुलनेत गेल्या एक महिन्यात १,७९५ आग लागल्याची नोंद झाली आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यापैकी ६६३ क्षेत्रांची अंमलबजावणी एजन्सी आणि संबंधित राज्यांतील अधिकारी आणि २५२ प्रकरणांमध्ये लादलेल्या पर्यावरणीय नुकसानाची भरपाईद्वारे तपासणी केली गेली आहे.

इस्रोने आयोगासाठी तयार केलेल्या प्रोटोकॉलवर आधारित अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत पंजाबमध्ये तण जाळण्याच्या घटना ६९.४९ टक्के, हरियाणामध्ये १८.२८ टक्के आणि उत्तर प्रदेशच्या आठ एनसीआर जिल्ह्यांमध्ये ४७.६१ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

चालू वर्षाच्या एका महिन्याच्या कालावधीत, पंजाबमध्ये तण जाळण्याच्या एकूण तक्रारी १,२८६ आहेत तर गेल्या वर्षी याच कालावधीत ४,२१६ होत्या.

हरियाणामध्ये ४८७ आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या गेल्या वर्षी ५९६ होत्या. यूपीमध्ये, या कालावधीत स्टबलला लागलेल्या एकूण आगीच्या घटना २२ आहेत, गेल्या वर्षीच्या ४२ च्या तुलनेत. दिल्ली आणि राजस्थानच्या दोन एनसीआर जिल्ह्यांमधून आगीच्या घटनांची नोंद झालेली नाही.

पंजाबमध्ये १६ सप्टेंबर रोजी, हरियाणामध्ये २९ सप्टेंबरला आणि उत्तर प्रदेशातील एनसीआर भागात १८ सप्टेंबर रोजी धानाचे अवशेष (तण) जाळल्याची नोंद झाली.

हे ही वाचा:

भाजपाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली

‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!

उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?

घाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा

पंजाबमध्ये तण जाळण्याचे प्रमुख केंद्र म्हणजे अमृतसर, तरण तारण, पटियाला आणि लुधियाना ही आहेत. चारा जाळण्याच्या घटनांमध्ये चार जिल्ह्यांचा वाटा अधिक आहे. त्याचप्रमाणे, हरियाणामधील प्रमुख हॉटस्पॉट म्हणजे कर्नाल, कैथल आणि कुरुक्षेत्र. या तीन जिल्ह्यांत तण जाळण्याच्या घटना ८० टक्के आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा