आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्री भवनात झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.या प्रकरणाचा तपास उत्तर जिल्ह्यातील अतिरिक्त डीसीपी अंजिता चिपियाला या करत आहेत.तसेच एसआयटीचे नेतृत्व देखील पोलीस अधिकारी अंजिता चिपियाला याच करणार आहेत.
पोलीस अधिकारी अंजिता चिपियाला यांच्याव्यतिरिक्त तीन इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे.तसेच यामध्ये सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे एसएचओ हे देखील आहेत, याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता एसआयटी मार्फत होणार आहे.
हे ही वाचा:
बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!
राऊतांची रडारड; म्हणे जिथे ‘उबाठा शिवसेने’ला भरघोस मतदान होऊ शकेल तिथेच कासव गतीने यंत्रणा सुरू
फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!
इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण प्रकरणी विभव कुमार सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. १८ मे रोजी तीस हजारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.शनिवारी (१८ मे) दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.विभव कुमारने तीस हजारी न्यायालयात अंतरिम जामीन अर्जही दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला.या मारहाण प्रकरणी विविध कलमांखाली विभव कुमार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.