दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमधून सरकारी महसुलाची कोटी कोटी उड्डाणे

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमधून सरकारी महसुलाची कोटी कोटी उड्डाणे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला ‘सोन्याची खाण’ म्हणून संबोधले.

हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस वे २०२३ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चालू झाल्यावर केंद्राला दरमहा १०००-१५०० कोटी रुपयांची टोल वसुली होईल.

भारतमाला प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मध्य प्रदेशसह चार राज्यांतून जाईल. सध्या राष्ट्रीय राजधानीपासून आर्थिक राजधानीपर्यंत जाण्यासाठी २४ तास लागतात. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी अर्धा वेळ म्हणजेच १२ तास लागतील.

एनएचएआयचे वार्षिक टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वाढून १.४० लाख कोटी रुपये होईल अशी माहिती गडकरी यांनी नुकतीच दिली. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राव्यतिरिक्त चार राज्यांमधून जाईल. रस्ते वाहतूक मंत्री म्हणाले की, देशातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा ही जागतिक दर्जाची यशोगाथा आहे.

बहुप्रतिक्षित राष्ट्रीय महामार्ग अर्थात दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या ऑपरेशननंतर केंद्र सरकार त्यातून दरमहा १०००-१५०० कोटी रुपयांची कमाई करेल. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली आहे. असा विश्वास आहे की हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस वे २०२३ पर्यंत तयार होईल.

हे ही वाचा:

शाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली

आता इंग्लंडलाही पाकिस्तान नकोसा!

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

ठाणे भाजपा सोशल मीडिया सेलतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा

नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI ला सोन्याची खाण म्हणून वर्णन केले आहे. गडकरींनी अलीकडेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक लांबचा प्रवास पूर्ण केला. नितीन गडकरी म्हणाले की, पुढील ५ वर्षात या एक्सप्रेसवेमुळे वार्षिक टोल उत्पन्न १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सध्या हे टोल उत्पन्न ४० हजार कोटींच्या वर आहे.

राष्ट्रीय राजधानी व्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग इतर ४ राज्यांमधून जाईल. हा एक्सप्रेस वे ८ लेनचा असेल आणि दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून जाईल. यासह, दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे अंतर २४ तासांपासून कमी होऊन अर्ध्या म्हणजेच १२ तासांपर्यंत कमी होईल.

Exit mobile version