विसरभोळेपणा प्रत्येकाकडे कमी अधिक प्रमाणात असतो. वाहनांमध्ये सामान विसरण्याचे प्रकार देखील घडत असतात. पण टॅक्सीमध्ये सामान विसरण्याच्याबाबतीत दिल्लीकरांनी सगळ्यांना मागे टाकले आहे . टॅक्सीमध्ये वस्तू विसरण्याच्या बाबतीत देशातील प्रमुख शहरांतील रहिवाशांमध्ये दिल्लीकरांचा क्रमांक पटकावला आहे. विसरभोळेपणाच्याबातीत मुंबई दोन वर्ष आघाडीवर होती पण आता ती जागा दिल्लीने घेतली असल्याचे टॅक्सी सेवा देणाऱ्या उबरने केलेल्या एक सर्वेक्षणामध्ये ही रंजक माहिती समोर आली आहे.
प्रवाशांनी मागील वर्षात उबरची सेवा वापरताना टक्सिमध्ये सामान सोडल्याच्या माहितीवर आधारित हे सर्वेक्षण आहे. आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीतील लोक देशात अव्वल आहेत, तर मुंबईतील लोक दोन वर्षांपासून या बाबतीत पुढे होते.हैदराबादने प्रथमच सर्वाधिक विसरणाऱ्या चार शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. तर मुंबई दुसऱ्या तर बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे.
प्रवास संपल्यानंतर प्रवासी टॅक्सीमध्ये फोन, बॅग, पाकीट आणि कपडे यासारख्या वस्तू विसरतात. पाण्याची बाटली, चाव्या, चष्मा आणि दागिनेही विसरतात. एक प्रवासी तर तर त्याची चालण्याची काठी, एक मोठा स्क्रीन टीव्ही टॅक्सीत विसरला . साधारणपणे फोन, बॅग, पाकीट आणि कपडे यासारख्या गोष्टी अनेकदा टॅक्सीमध्ये विसरल्या जातात. दिल्लीनंतर हैदराबाद आणि बेंगळुरू शहरेही यामध्ये मागे नाहीत.
हे ही वाचा:
खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !
‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’
६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !
‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी
या गोष्टींचा पडतो विसर
टीव्ही, वेस्टर्न कमोड, पॅक केलेले दूध, पडदे, झाडू, काठी , इंडक्शन स्टोव्ह, फॅमिली कोलाज, यंत्र , स्कार्फ , कॉलेजचे प्रवेश कार्ड आणि बाळाचे स्ट्रोलरही या वस्तूही यातून सुटलेल्या नाहीत.
विकेंडला पडतो जास्त विसर
दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांतील लोक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बहुतेक गोष्टी विसरतात. तर आजकाल लोक संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी आपले सामान कॅबमध्ये विसरतात. वेळेवर नजर टाकली तर असे म्हणता येईल की वीकेंडला घरी जाण्याच्या घाईत लोक आपले सामान टॅक्सी मध्येच विसरतात.