केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

जनतेला दिलेली आश्वासने अपूर्ण राहिल्याने राजीनाम्याचे दिले कारण

केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात कैलाश गेहलोत यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने राजीनामा देत असल्याचे कारण सांगितले आहे.

दिल्लीतील परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, महिला व बालविकास यासारखे खाते असलेले मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपला राजीनामा दिल्ली सरकारच्या एनसीटीच्या मंत्रीपरिषदेकडे सादर केला आहे. दिल्लीतील जनतेला दिलेली महत्त्वाची आश्वासने पूर्ण करण्यात पक्षाच्या असमर्थतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील सततच्या संघर्षामुळे शहराच्या प्रगतीला खीळ बसली असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्राशी लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे, असे गेहलोत म्हणाले. दरम्यान, केजरीवाल सरकारमधील प्रमुख मंत्री गेहलोत यांचा राजीनामा आम आदमी पक्षासाठी एक महत्त्वपूर्ण धक्का आहे. विशेषतः, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत, तत्पूर्वी गेहलोत यांचा राजीनामा पक्षाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा : 

मोदी म्हणाले म्हणून, १२ वर्षानंतर राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली!

पत्रकार हे मालकांचे गुलाम, राहुल गांधी यांनी पत्रकारांना दाखवली जागा

सायबर क्राईम टोळीचा पर्दाफाश

वाँटेड तस्कर हाजी सलीमच्या सिंडिकेटशी संबंधित चार हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त

 

 

Exit mobile version