जगभर सुरु असलेली कोरोना महामारी संपायचे नाव घेत नाहीये. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. देशात दिवसागणिक कोरोना महामारीचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत चालले आहेत. राजधानाची दिल्लीतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दिल्लीत एक महत्वाचा निर्णय घेत पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.
आज म्हणजेच बुधवार, २० एप्रिल पासून राजधानी दिल्लीमध्ये मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कोणीही विरोध दर्शवला आणि मास्क वापरले नाही तर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
प्रसिद्ध अभिनेते, अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या दोन पुस्तकांचे शुक्रवारी प्रकाशन
नागालँडमधील फुटीरतावादी संघटनां सोबतच्या युद्धविराम कराराला मुदतवाढ
भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक
कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
गेल्या २४ तासांत भारतात २०६७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक हा आकडा वाढत जात आहे. तर हळूहळू कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्याही येताना दिसत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाही लाट येणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. तर आता महाराष्ट्रात आणि देशात इतरत्रही कोविड प्रतिबंध लावले जाणार का? अशी चिंता सगळ्यांना सतावत आहे.