विशाखापट्टणम येथे रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने दिल्लीचा १०६ धावांनी पराभव केला. कोलकात्याने २७२ धावांचा डोंगर रचून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या धावसंख्येची नोंद केली. दिल्लीला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि त्यांचा संघ १७.२ षटकांत अवघ्या १६६ धावाच करू शकला. या पराभवामुळे कोलकात्याचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला असून त्यांनी धावगतीच्या जोरावर राजस्थानला मागे टाकले आहे.
कोलकात्याने त्यांची आधीची सर्वोच्च धावसंख्येच्या २७ धावा जास्त केल्या. मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा यांनी घेतलेल्या दोघांच्या झटपट विकेट. सुनील नारायणच्या ८५, अंगक्रिशच्या ५४ आणि अँड्रे रसेलच्या ४१ धावा आणि वरुण चक्रवर्ती यांची उत्तम गोलंदाजी याच्या जोरावर त्यांनी ऋषभ पंतच्या दिल्लीला चित केले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोलकात्याने तीनपैकी तीनही सामने जिंकले आहेत. त्यांच्या संघाने दोनची धावगतीही गाठली आहे.
खलील अहमद आणि इशांत शर्मा यांनी काटेकोर गोलंदाजी करून नरिनला केवळ सहा धावांमध्ये एकच धाव करता आली.
तर, फिल सॉल्टने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यानंतर नरिनने इशांतच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि दोन चौकार लगावून २६ धावा केल्या. त्यानंतर नारायण आणि सॉल्ट यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि त्यांनी २७ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली.
सॉल्ट १२ चेंडूंत १८ धावा करून एनरिच नोर्ट्जेच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र तरीही नारायणचा वेग मंदावला नाही. त्याने अंगक्रिश रघुवंशीच्या साथीने २७ चेंडूंत ५४ धावा केल्या. कोलकात्याने तब्बल १८ षटकार आणि २२ चौकार मारल्याने कोलकात्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
हे ही वाचा:
‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत सहभागी होण्याच्या सौदी अरेबियातील मॉडेलच्या दाव्याबाबत संभ्रम
“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”
‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले
नारायण याने सात षटकार आणि सात चौकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावा केल्या. त्याची ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. नारायणने गेल्या तीन मोसमांत सर्व सामने मिळून १०० धावाही केलेल्या नाहीत. मात्र यंदाच्या मोसमात त्याने १५० धावांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. नारायण याला सलामीला पाठवण्याचा माजी कर्णधार व मेंटॉर गौतम गंभीर यांचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला आहे.