बीआरएस नेत्या के.कवितांना कोर्टातून मोठा झटका!

अंतरिम जामिनाची मागणी कोर्टाने फेटाळली

बीआरएस नेत्या के.कवितांना कोर्टातून मोठा झटका!

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.के.कविता यांनी अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी(८ एप्रिल) फेटाळून लावला आहे.

दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के.कविता यांनी अंतरिम जामीनासाठी गुरुवारी (४ एप्रिल) राऊस ॲव्हेन्यू कोर्टात अर्ज केला होता.त्यांनी याचिकेत दावा केला होता की, तिच्या १६ वर्षांच्या मुलाची परीक्षा आहे आणि त्याला त्याच्या आईच्या आधाराची गरज आहे.

हे ही वाचा..

काय सांगता! चक्क उंदरांनी १९ किलो गांजा आणि भांग खाल्ला!

गडचिरोली पोलीस दलाची कारवाई; दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक

‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!

४१ दिवस शांततेचे…

बीआरएस नेत्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी केला की, के कविता यांच्या मुलाची परीक्षा असल्याने परीक्षेच्या काळात त्याला त्याच्या आईच्या आधाराची गरज असते.आईच्या अनुपस्थिती वडील, बहीण किंवा भाऊ हे पूर्ण करू शकत नाही.त्यामुळे त्यांचा अंतरिम जामीन मंजूर करावा.

यावर सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने वकील जोहेब हुसैन म्हणाले की, कविता या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.तपास यंत्रणांचा शोध योग्य कर्मावर असून त्याचा यश मिळण्याच्या मार्गावर आहे आणि कविता यांना जर जमीन दिला तर तपासात अडथळा येईल.त्यांच्या मुलाच्या १२ पैकी ७ परीक्षा झाल्या असून त्याच्या सोबत त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे वडील आहेत, असे जोहेब हुसैन म्हणाले.दरम्यान, दारू घोटाळ्याप्रकरणी के कविता यांना ईडीने १५ मार्च रोजी हैद्राबाद येथून अटक केली होती.

Exit mobile version