दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’

पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली माहिती

दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’

दिल्ली सरकारने यंदाही फटाके विक्री आणि खरेदीवर बंदी घातली आहे. थंडीच्या काळात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही माहिती दिली.

मंत्री गोपाल राय म्हणाले की, १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांची ऑनलाइन विक्री आणि वितरणावर बंदी असणार आहे. दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती आणि महसूल विभाग या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करतील. या संदर्भात सर्व संबंधित विभागांकडून एकत्रितपणे कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या पथके आवश्यक पावले उचलतील. यासाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीकडून अधिसूचनाही जारी केली जाणार आहे, असे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

दरम्यान, हिवाळ्यात दिल्लीमध्ये प्रत्येक वेळी प्रदूषण वाढ होते, श्वास घेणेही कठीण होते. अशा परिस्थितीत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालणे हाही एक उपाय आहे. मात्र, अनेक लोक दिवाळीत फटाके फोडणे सोडत नाहीत. सर्व निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे असतानाही दरवर्षी दिवाळीत प्रचंड प्रदूषण पाहायला मिळते. गेल्या वर्षीही दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले होते.

हे ही वाचा : 

४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा

३० वर्षांपूर्वी बांधलेल्या मशिदीच्या कमानीवर प्रशासनाचा बुलडोजर !

हिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा…

उत्तर प्रदेशात मशिदीवर रातोरात उभ्या राहिल्या तीन मिनार !

Exit mobile version