दिल्ली उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल आला आहे.धमकीचा मेल आल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे.धमकीच्या मेलनंतर दिल्ली उच्च न्यायालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली.एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रजिस्ट्रारला बुधवारी त्यांच्या अधिकृत खात्यावर एक ईमेल प्राप्त झाला होता.या मेल मध्ये म्हटले होते की, उद्या (१५ फेब्रुवारी) दिल्लीत स्फोट होईल.दिल्लीतील हा सर्वात मोठा स्फोट असणार आहे.जेवढी सुरक्षा वाढवायची असेल तेवढी वाढवून घ्या, सर्व मंत्र्यांना देखील बोलवून घ्या, हे सर्व एकसाथ उडतील, असे मेलमध्ये लिहिले होते.
हे ही वाचा:
इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!
काँग्रेसने सत्तेत असताना एमएसपीचा फॉर्म्युला नाकारला होता अन् आता देणार कायदेशीर हमी
मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर
हल्दवानी हिंसाचारातील सूत्रधार अब्दुल मलिकसह नऊ आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
या धमकीला गांभीर्याने घेत पोलिसांकडून हायकोर्टाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून ईमेलही तपासले जात आहेत.तसेच इतर जिल्हा न्यायालयांमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.