राहुल गांधींचे निकटवर्तीय साकेत गोखले याला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. भारताच्या संयुक्त राष्ट्रातील माजी असिस्टंट सेक्रेटरी जनरल लक्ष्मी पुरी यांच्या विरोधात खोटी ट्विट केल्या प्रकरणी गोखलेची खरडपट्टी करण्यात आली आहे.
स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवणाऱ्या साकेत गोखले याने लक्ष्मी पुरी यांच्या विरोधात खोटे ट्विट करत त्या काळ्या पैशाच्या साठेदार आहेत असे म्हटले होते. गोखलेच्या या बिनबुडाच्या आरोपां विरोधात लक्ष्मी पुरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीची याचिका दाखल केली होती. साकेत गोखले यांनी त्वरित ट्विट डिलीट करावे आणि पाच करोड रुपयांची मानहानी द्यावी अशी मागणी पुरी यांनी आपल्या याचिकेत केली होती.
हे ही वाचा:
महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश
पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने साकेत गोखलेला चांगलेच झापले आहे. पुढल्या २४ तासात ही बदनामीकारक ट्विट डीलिट करावी आणि लक्ष्मी पुरी यांच्या विरोधात आता पुन्हा ट्विट करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गोखले याने ट्विट डिलिट न केल्यास ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटने ही ट्विट्स डीलिट करावी असे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.
लक्ष्मी पुरी या केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या पत्नी आहेत. साकेत गोखले हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जवळचा मानला जातो. ट्विटर आणि इतर समाज माध्यमांतून तो भाजपा विरोधात पोस्ट करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. भाजपावर सातत्याने आरोप करताना तो दिसतो. गोखलेने लक्ष्मी पुरी यांच्या विरोधात १३ जून आणि २६ जून रोजी ऊशीच ट्विट्स केली होती. पुरी यांनी स्वित्झर्लंडमध्ये काही संपत्ती खरेदी केल्याचा दावा गोखलेने आपल्या ट्विटमध्ये केला होता. तर त्यात लक्ष्मी पुरी यांचे पती केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा ही उल्लेख करण्यात आला होता.