27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषदिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

एक्स्प्रेस वेचे ६०-७० टक्के बांधकाम पूर्ण

Google News Follow

Related

दिल्ली- डेहराडून दरम्यान बांधण्यात येत असलेला नवीन एक्स्प्रेस वे या वर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होईल. त्यानंतर दिल्ली ते डेहराडून हे अंतर दोन तासांत कापले जाईल. दिल्ली ते डेहराडून दरम्यान बांधल्या जाणाऱ्या या २१२ किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेची बांधण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. मंत्री गडकरी यांनी सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे हवाई सर्वेक्षण केले

‘लोक आता फक्त दोन तासात दिल्लीहून डेहराडूनला पोहोचू शकतील. त्याचबरोबर दिल्ली ते हरिद्वार हे अंतरही ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. दिल्ली डेहराडून एक्स्प्रेस वेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेचे ६०-७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवे चार विभागांमध्ये विभागलेला आहे. ती दिल्लीतील अक्षरधाम मंदिरापासून सुरू होईल आणि दिल्लीच्या शास्त्री पार्क, खजुरी खास, मंडोला, बागपत, शामली, सहारनपूर, उत्तर प्रदेशमधील खेकरा येथील ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेमार्गे डेहराडूनला जाईल. गणेशपूर ते डेहराडून दरम्यानच्या भागात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी १२ किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. महामार्गावर सहा अंडरपास बांधण्यात आले आहेत. विशेष हत्ती कॉरिडॉर आणि दोन मोठे पूल आणि १३ छोटे पूलही बांधण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

७१ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्या

नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात

चार विभागांमध्ये विभागलेला हा एक्स्प्रेस वे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे  पासून दिल्लीतील अक्षरधाम जवळ, शास्त्री पार्क, खजुरी खास, मंडोला येथील खेकरा, बागपत येथील ईपीई इंटरचेंजपासून शामली, सहारनपूर, उत्तर प्रदेश ते डेहराडून, उत्तराखंड पर्यंत बांधण्यात आला आहे. . दतकली, डेहराडून येथे १,९९५ कोटी रुपये खर्चून ३४० मीटर लांबीचा, ३-लेन बोगदा देखील बांधला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा