25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषदिल्ली समोर हैदराबादचा सूर्य मावळला

दिल्ली समोर हैदराबादचा सूर्य मावळला

Google News Follow

Related

आयपीएलमध्ये बुधवार, २२ सप्टेंबर रोजी रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सन रायजर्स हैदराबाद सामन्यात दिल्लीचा संघ विजयी झाला आहे. दिल्ली संघातील गोलंदाजांच्या कामगिरीमुळे हैदराबाद संघाची दाणादाण उडाली. दिल्ली संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेचे गोलंदाज नॉर्खिया आणि राबाडा हे दिल्ली संघासाठी स्टार ठरले.

आयपीएल २०२१ च्या ३३ व्या सामन्यात दिल्ली आणि हैदराबाद हे दोन संघ एकमेकांना भिडले. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. अब्दुल समदचा २८ धावांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, वृद्धिमान सहा, मनीष पांडे, केदार जाधव अशा दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत फक्त १३४ धावांची मजल मारता आली.

हे ही वाचा:

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!

…म्हणून जम्मू-काश्मीरमधील सहा कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

१३५ धावांचे विजयी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाने ८ गडी राखून अवघ्या १८ षटकांत हा टप्पा पार केला. पृथ्वी शॉ चा अपवाद वगळता शिखर धवन (४२) श्रेयस अय्यर (४७) आणि ऋषभ पंत (३५) यांनी अगदी सहजरित्या दिल्ली संघाला विजय मिळवून दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा