दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांचा स्फोट होत असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सौम्य लक्षणे आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

दिल्लीत सोमवारी कोरोनाची ४ हजार ९९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, संसर्गाचं प्रमाण ६.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

हे ही वाचा:

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

ओमायक्रोनचा देशात शिरकाव होताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा विस्फोट होत असून राज्यातील अनेक मंत्र्यांना आणि बॉलीवूड मधील मंडळींना कोरोनाने गाठल्याचे चित्र आहे. हिवाळी अधिवेशनानंतर अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र, राज्यात लगेच लॉकडाऊन न लावण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले असले तरी निर्बंध कठोर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version