दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांबरोबर साजरी केली होळी

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांबरोबर साजरी केली होळी

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता गुरुवारी रोहिणीतील ‘आशा किरण’ शेल्टर होमला भेट दिली. त्यांनी तेथील विशेष मुलांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी मुलांना गुलाल लावले आणि त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेल्टर होमच्या सोयीसुविधांचा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला.

रेखा गुप्ता म्हणाल्या, “मी आज ‘आशा किरण’मधील मुलांसोबत होळी साजरी केली. हा अनुभव खूप आनंददायी होता. मुलं खूप आनंदी दिसत होती.” तसेच त्यांनी पुढे सांगितले, “मी समजून घेऊ इच्छित होते की येथे मुलांना कोणत्या सोयी आहेत आणि कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत. काही त्रुटी आढळल्या असून, मी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.”

हेही वाचा..

१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला आता हिंदू सण आठवले, आदित्य ठाकरेंचा हा खोटारडेपणा!

‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन

‘शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यास सांगत असे, भेदभावामुळेच कारकीर्द संपली!

अनपेक्षित भेटी आणि सुधारणा करण्यावर भर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “भविष्यात मी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी करेन, जेणेकरून व्यवस्थेत सुधारणा होईल.” त्यांनी दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या, तसेच शेल्टर होमची क्षमता वाढवण्यावर भर दिला, जेणेकरून अधिक गरजू मुलांना निवारा मिळू शकेल.
दिल्लीवासीयांना होळीच्या शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, “होळी हा आनंद आणि रंगांचा सण आहे, पण आपण तो जबाबदारीने साजरा केला पाहिजे. पाण्याचा अपव्यय करू नका आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा. दिल्ली स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांनी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “होलिका दहनाच्या शुभमुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा! हा सण सत्य, धर्म आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. नकारात्मकता, अहंकार आणि कटुता यांना मागे टाकून प्रेम, सौहार्द आणि नव्या उमेदीनं पुढे चला.”

Exit mobile version